Type Here to Get Search Results !

बंद घर फोडून २ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज लंपास

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : बंद घराचे मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून २ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,परेश शशिकांत नसेरीकर (वय-४२) रा. फ्लॅट नंबर.८१ आरती विहार, प्रताप नगर, विजापूर रोड,सोलापूर यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोंडा उचकटून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. व त्यानंतर घरामधील असलेले १ लाख ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे ४ सोन्याच्या बांगड्या,३५ हजार रुपयांची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,१७ हजार रुपयांची ५ ग्राम वजनाचे कानातील टॉप,५१ हजार रुपयांची ५ ग्रॅम वजनाचे ३ सोन्याची नाणी असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज घरातून चोरून नेला. ही घटना १२ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई बनकर हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies