प्रदीप राऊत यांची रत्नत्रय शैक्षणिक संकुलास भेट. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 27, 2019

प्रदीप राऊत यांची रत्नत्रय शैक्षणिक संकुलास भेट.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : मांडवे ता. माळशिरस येथील रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे अन्न व औषध प्रशासन सोलापूर  आयुक्त प्रदीप  राऊत  यांनी सोमवार  25 नोव्हेंबर रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
 याप्रसंगी प्रशालेचे चेअरमन प्रमोद दोशी, कमिटी सदस्य अभिजित दोशी, मुख्याध्यापक श्री. देशपांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, माळशिरस तालुक्यातील मांडवे सारख्या ग्रामीण भागात  अनंतलाल दोशी यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये हे शैक्षणिक संकुल मजबूतपणे उभा रहात असल्याचे पाहून मला अभिमान वाटत आहे. त्याच बरोबर या प्रशालेत झालेला माझा सत्कार हा माझ्या कर्मभूमीतील सत्कार आहे, त्यामुळे मला विशेष आनंद आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Advertise