आटपाडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

आटपाडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

माणदेश एक्सप्रेस न्युज  
आटपाडी/ प्रतिनिधी : राज्यात पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आटपाडीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद व जल्लोष व्यक्त केला विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री व सत्तास्थापनेचा घोळ सुरू होता अचानक काल सकाळी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याची बातमी आली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील अशी आशा वाटत होती. खानापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे आमदार अनिल बाबर विजयी झाले आहेत. त्यामुळे आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद मिळेल अशी राजकीय चर्चा रंगली असतातच काल भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस झाल्याचे राजकीय सु:खद घटना भाजप कार्यकर्त्यांना व नेत्यांना राजकीय बळ देणारी ठरली. त्यामुळे भाजपाच्या आटपाडी तालुक्यातील नेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, जि.प. सदस्य अरुण बालटे, पं.स. सदस्य रुपेशकुमार पाटील, जयवंत सरगर, विकास पाटील, बिरूदेव खांडेकर, प्रभाकर पुजारी, भाजपचे तालुकाध्यक्ष विलास काळेबाग, अनिल कदम, प्रमोद धायगुडे, आदी कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
खास. संजयकाका पाटील, भाजपचे नेते माजी आम. राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. राज्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते तरीदेखील आनंदोत्सव साजरा झाला असता, कारण भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन शिवसेनेचा उमेदवार खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला होता. त्यामुळे भाजप किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर दुहेरी आनंद आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांना होणार होता.

No comments:

Post a Comment

Advertise