महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे स्थिर सरकार येणार : राजाराम देशमुख. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे स्थिर सरकार येणार : राजाराम देशमुख.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माध्यमातुन महाराष्ट्राला लवकरच स्थिर सरकार मिळणार आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भुमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत विश्वास टाकला आहे. त्यातुन राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होवुन महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा मार्ग निर्माण होईल असे राजाराम देशमुख म्हणाले,
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या सत्ता स्थापनेचा तिढा आता संपुष्टात आला असुन लवकरच राज्यात स्थिर सरकार देण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सर्व नेते करणार आहेत. ही गोष्ट राज्याला दिलासा देणारी असुन जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी स्थिर सरकारची होणारी मागणी लवकरच पुर्णत्वास येत आहे. काँगसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी.वेणुगोपाल, अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांनी महाविकास आघाडीचे स्थिर सरकार स्थापन्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.ही गोष्ट आनंददायी असुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यानिमित्ताने केंद्रबिंदु ठरले आहेत. राज्यातील जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी तीनही पक्षांच्या भुमिकेचे जनतेतुन स्वागत होत आहे. .
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेवुन महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबतची भुमिका मांडली. पवार साहेबांच्या भूमिकेला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही पाठबळ दिल्याने अनेक दिवसांची सत्ता स्थापनेची कोंडी फुटणार आहे. लवकरच स्थिर सरकार कार्यान्वित होवुन राज्यातील दुष्काळ, अवकाळीशी मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्यांना, जनतेला दिलासा मिळेल. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांसह अनेक गोष्टींमुळे राज्यातील जनता हैराण आहे. भाजपबाबत जनतेत नाराजी आहे. लोकांना सर्वागिण विकास गरजेचा आहे. सर्वसामान्य जनता, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांना अपेक्षीत असणारी तीन पक्षांची होत असलेली एकी येणाऱ्या कालावधीत प्रगतीचा नवा अध्याय निर्माण करेल असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Advertise