अमरसिंह देशमुख यांची लाकडी खाद्यतेल घाण्यास भेट. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 18, 2019

अमरसिंह देशमुख यांची लाकडी खाद्यतेल घाण्यास भेट.                                                                                                   माणदेश एक्सप्रेस न्युज 
दिघंची/वार्ताहर : दिघंची येथील लाकडी तेल घाण्यास सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे संस्थापक अमरसिंह देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा केशव मिसाळ यांनी विषमुक्त गुळ भेट देवून सत्कार केला. 
दिघंची येथे ग्रामपंचायत सदस्य केशव मिसाळ यांचे माणदेश ग्रामोद्योग संचलित लाकडी खाद्यतेल घाना केंद्र आहे. येथे शुद्ध विषमुक्त लाकडी घाण्यापासून खाद्यतेल तयार केले जाते. यावेळी जि.प. सदस्य मोहन रणदिवे, जि.प. अरुण बालटे, आटपाडी बाजार समितीचे संचालक ऋषीकेश देशमुख, बंडु मोरे, सयाजी मोरे आदी उपस्थित होते.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा

No comments:

Post a Comment

Advertise