शेतकऱ्यांना तातडीने मदत करा; माण तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

शेतकऱ्यांना तातडीने मदत करा; माण तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर बाहेर काढण्यासाठी शासनाकडून मदत मिळावी यासाठी माण तालुका शिवसेनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन माणच्या तहसीलदार यांना देण्यात आले. 
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचे उपस्थितीत माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांचे नेतृत्वाखाली व शिवसेना पदाधिकारी यांचे उपस्थितीत हे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. माण तालुक्यात गेले दहा वर्षे अत्यल्प पाऊस पडला होता. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला होता. यावेळीही सुरवातीच्या काळात अत्यल्प पाऊस पडला मात्र परतीच्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला बळीराजा आणखी अडचणीत आला.
यामध्ये माण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, राज्यपाल यांचे आदेशानुसार हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ही मदत अत्यंत तुटपुंजी असून ती हेक्टरी २५ हजार रुपये करावेत अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा सातबारावर नोंद असलेल्या पिकांवरून पंचनामे करण्यात यावेत. पीकविमा कंपन्यांकडून पंचनाम्यानुसार १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, रब्बी हंगाम पेरणीसाठी तातडीने मदत करण्यात यावी, बँकांकडून सक्तीने होत असलेली कर्ज वसुली तात्काळ थांबविण्यात यावी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी उपतालुका प्रमुख शिवदास केवटे, अंबादास शिंदे, विभागप्रमुख सुभाष काटकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise