Type Here to Get Search Results !

विजय देवकर यांचा सन्मान


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : शेटफळ गावचे सुपुत्र विजय देवकर यांनी सहाय्यक निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेला समीर आठल्ये दिग्दर्शित बकाल हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आटपाडीतील  कला रसिकांनी उत्तुंग प्रतिसाद दिला. काल हा चित्रपट पाहायला आलेल्या रसिकांनी विजय देवकर यांचा सत्कार करून त्यांचे सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा.विश्वनाथ जाधव,  प्रा.बालाजी वाघमोडे, प्रा.विजय शिंदे, दत्तात्रय पाटील (पंच), राहुल पाटील, संपत पाटील, राजेंद्र यादव, नरेंद्र दिक्षित, कवी.चंद्रवर्धन लांडगे, सतीश भिंगे, अविनाश बाड, प्रा.सुरेश गायकवाड, योगेश स्वामी, हिमेश हिंगमीरे, रणजित गायकवाड, आकाश मोकाशी, बालाजी पावले, उत्तम बालटे, पी.एन.कदम, दत्तात्र्यय स्वामी, राजाभाऊ लांडगे, संतोष देशमुख, दत्ता कांबळे, पांडुरंग गायकवाड, अमित काटकर, रोहित चंदनशिवे, निवास पाटील इत्यादी उपस्थित होते.
विजय देवकर यांनी आतापर्यंत घायाळ हरणी, वासू लव सपना, संगु निघाली सॅम संग, पुरुषोत्तम, बंदिशाळा, कोयता एक संघर्ष, सावी, जननी, बनी, कोती  इ. चित्रपटाच्या निर्मिती व्यवस्थापनाचे काम केले आहे. त्याच बरोबर नामवंत जेष्ठ सिनेअभिनेते कै. सदाशिव अमरापूरकर यांची कन्या दिग्दर्शिका रीमा अमरापूरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या जननी या लघुपटाची आंतरराष्ट्रीय कांन्स फेस्टिव्हलमध्ये निवड झाली होती त्यामध्येही विजय देवकर यांनी सुंदर असा अभिनय साकारला होता. त्याचबरोबर त्यांचे निर्मिती व्यवस्थापन देखील त्यांनी पाहिले होते. बकाल हा चित्रपट हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड बनवण्यात आला आहे. संपूर्ण प्रबळ तंत्रज्ञ आणि नामवंत कलाकार तसेच सध्याच्या तरुणाईला भुरळ घालणारे संगीत व गाणी, नृत्य असा हा चित्रपट सहकुटुंब बघावा असा बनविण्यात आला आहे.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies