राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयास आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची सदिच्छा भेट. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 28, 2019

राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयास आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची सदिच्छा भेट.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : विधानभवनात आमदार पदाची शपथविधी पार पडल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी चर्चगेट येथील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयास सदिच्छा भेट दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. गुट्टे यांचे स्वागत केले.  यावेळी डॉ. गुट्टे यांना पेढा भरवत 'राष्ट्रीय समाज पक्ष'तर्फे अभिनंदन करण्यात आले. डॉ. रत्नाकर गुट्टे हे रासपचे विधानसभेतील  एकमेव आमदार आहेत. कारागृहातून निवडणूक लढवत त्यांनी गंगाखेड विधानसभा क्षेत्रात दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी महादेव जानकर यांच्याहस्ते डॉ. गुट्टे यांना  विधानसभा सदस्यत्वाचा बँच प्रदान करण्यात आला.

यावेळी रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशिल, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील, रासपचे युवा नेते राजेभाऊ फड, मुंबई प्रदेश रासप युवक आघाडी अध्यक्ष संतोष माने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise