आटपाडीत उद्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा शेतकऱ्यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा : सभापती भाऊसाहेब गायकवाड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 28, 2019

आटपाडीत उद्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा शेतकऱ्यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा : सभापती भाऊसाहेब गायकवाड.

माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभाग व कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी यांच्यावतीने "निर्यातक्षम डाळींब उत्पादन व पणन व्यवस्था" या विषयावर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन उद्या दिनांक २९ रोजी सकाळी १०.३० वा. श्री कल्लेश्वर मंदिर सभागृह येथे अपोडा मुंबईचे उपसंचालक श्री रविंद्रन यांच्या हस्ते  होणार आहे.
सदर कार्यशाळेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगलीचे श्री निळकंठ करे, सहाय्यक निबंधक बिपिन मोहिते, तालुका कृषी अधिकारी राहुल जीतकर मार्गदर्शन करणार आहेत  आटपाडी तालुक्यातील सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise