विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह पाच जणांवर गुन्हा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 13, 2019

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह पाच जणांवर गुन्हा


माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : लग्नात केलेला खर्च माहेरुन घेऊन ये म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नम्रता अमोल क्यातम (वय-२१) रा. प्लॉट नंबर १ घनाते अपार्टमेंट, समर्थ प्रोव्हीजन जवळ,  अक्कलकोट नाका, सोलापूर हिला सासरकडच्या मंडळींनी दहा लाख रुपये व सोने कपडे व लग्नात झालेला खर्च माहेरून घेऊन ये असे म्हणून नम्रता हिचा मानसिक व शारीरिक त्रास दिला. व फिर्यादी नम्रता हिला नांदवण्यास देखील पतीने नकार दिला. त्यानंतर फिर्यादीने सासरी फोन लावला असता तु येताना सोने, कपडे व लग्नात झालेला खर्च माहेरून घेऊन येत असेल तर ये, नाहीतर आमच्या घरी येऊ नकोस असे म्हणून फोन बंद केला. 
त्यानंतर देखील फिर्यादीने सासरच्या मंडळींना फोन केला परंतु ते फोन उचलत नव्हते. ही घटना ८ मे २०१९ पासून ते आज पर्यंत घडली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबत पती अमोल मनोहर क्यातम, सासु ललीता मनोहर क्यातम, नणंद तेजस्वी मनोहर क्यातम,  रा. २५८, गजपेठ, मीठगंज,  पोलीस चौकी जवळ, पुणे -४२, स्वरूपा मधुकर कोकुळ,  मधुकर कोकुळ दोघेही, रा. रामचंद्र एम्पायर, ६ वा मजला, वालचंद कॉलेज समोर, सोलापूर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे हे करित आहेत.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise