माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे, माळशिरस तालुका भाजपच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब सरगर यांची चर्चा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 28, 2019

माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे, माळशिरस तालुका भाजपच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब सरगर यांची चर्चा.


                                                                                                     
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष पासून तालुका अध्यक्ष पर्यंतचा कार्यक्रम जाहीर झाला असून तालुका अध्यक्ष पदाच्या निवड येत्या 25 तारखेपासून  सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व निरा देवधर पाणी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर हे नाव प्रमुख्याने आघाडीवर असल्याचे चित्र  तालुक्यामध्ये दिसत आहे. 
गेली अनेक वर्ष प्रमाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे काम करत असून   नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते त्यांना निवडून   आणण्यासाठी त्यांनी त्यांचा प्रचार हिरीरीने केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कमळ माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदाच  फुलले. त्यामुळे येणारा नवीन तालुकाध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले मोहिते पाटील कुटुंबीय  यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असणारा असावा लागणार आहे.
सरगर हे गेली वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. त्यांचे  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व  सहकार मंत्री सुभाष देशमुख  त्यांचेबरोबर सलोख्याचे संबंध आहेत महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून  गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा दुष्काळी 22 गावांचा  गावाचा नीरा देवधर  प्रकल्प प्रकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून  तो मार्गी लावला. शिवाय नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना अनेक गरजूंना  योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्या या कामामुळेच त्यांची भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदाच्या  शर्यतीमध्ये नाव आघाडी असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise