मायभूमीने केलेला सन्मान सर्वात मोठा : केशव तरंगे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 25, 2019

मायभूमीने केलेला सन्मान सर्वात मोठा : केशव तरंगे.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : जगात कितीही सन्मान झाले, तरी मायभूमीने केलेला सन्मान सर्वात मोठा असतो. असे प्रतिपादन पालघरचे नायब तहसिलदार केशव तरंगे यांनी केले. तरंगफळ ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी केशव तरंगे यांची नेमणूक झाल्याबद्दल ग्रामपंचायत तरंगफळ व जि.प.प्रा.शाळा तरंगफळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित  करण्यात आला होता. सरपंच ज्ञानेश्वर(माऊली)कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत कबड्डी व लंगडी या खेळात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामस्तांच्या वतीने विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच सुजित तरंगे, वन समितीचे अध्यक्ष जयवंत तरंगे, माजी संचालक जयंतलाल तरंगे, माजी सैनिक शिवाजी कांबळे, उपसरपंच अविनाश तरंगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाजीराव तरंगे, श्री. वलेकर, गोविंद कांबळे, रघुनाथ तरंगे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise