संविधान,संसद, सर्वोच्य न्यायालय आमच्यासाठी प्राणप्रिय : सादिक खाटीक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 12, 2019

संविधान,संसद, सर्वोच्य न्यायालय आमच्यासाठी प्राणप्रिय : सादिक खाटीकमाणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  भारतीय संविधान , संसद , सर्वोच्य न्यायालय आमच्यासाठी प्राणप्रिय आहे. अयोध्या प्रश्नी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो असे मत मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी व्यक्त केले. ते आटपाडी येथील तहसील कार्यालयात आयोध्या निकाल प्रकरणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.
यावेळी तहसीलदारसचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, कृषी अधिकारी राहुल जितकर, तालुक्यातील विविध गावचे पोलीस पाटील, मुस्लीम समाजाचे नेते फिरोज खाटीक, माजी ग्रा.पं. सदस्य  बशीर मुल्ला, विदयमान ग्रा.पं. सदस्य बॅलीस्टर मुल्ला, दिलावर शेख, महंमद शेख, रियाज शेख, ताजुद्दीन इनामदार, एजाज मुलाणी, इन्नुस मुलाणी, रियाज मुलाणी, अय्याज मुलाणी, भिंगेवाडीचे माजी सरपंच नजीर शेख, हामीद शेख, मोहीद्दीन शेख, आशीक शेख, मुसा शेख, राजू शेख, आब्बास मुलाणी इ. प्रमुख बैठकीला उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, एकता, बंधूता, सर्वधर्म सदभाव या विचारधारेने पिढयान पिढया आम्ही  विविध धर्मिय गुण्यागोविंदाने रहात आलो आहोत. वर्तमान आणि भविष्यातही हीच बंधूत्वाची नाळ आणखी मजबूत होईल. आटपाडी तालुक्याच्या मागील वर्षाच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास धार्मिक सलोखा, सदभाव, भिन्न धर्मिय विविध सण उत्सवात सर्वांचाच असणारा सहभाग आम्ही सर्व भारतीय बांधवच असल्याचा प्रत्यय दाखवून देत आहे.

 दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा.

No comments:

Post a Comment

Advertise