Type Here to Get Search Results !

आटपाडीत उत्तरेश्वर यात्रेतील सायकल स्पर्धा संपन्न.





आटपाडी/प्रतिनिधी : ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानाच्या यात्रेतील सायकल स्पर्धेत प्रकाश बाळू ओलेकर. रा.कोकळे ता.कवठेमहांकाळ याने प्रथम क्रमांक मिळवला, तर राम विष्णू जाधव, रा. सांगलवाडी ता. मिरज यांना द्वितीय क्रमांक मिळाला असून तृतीय क्रमांक पवन सखाराम पाटील, रा. डफळापूर ता.जत यांनी मिळवला.

आटपाडीच्या कार्तिक महिन्यातील उत्तरेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त काल भव्य सायकल स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भवानी विद्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी सरपंच सौ. वृषाली पाटील, उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, वरदान उद्योग समुहाचे संचालक अॅड. धनंजय पाटील, समितीचे सचिव शशिकांत जाधव, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गोसावी. ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार पाटील, बाळासाहेब मेटकरी, रेखा ऐवळे, स्वाती देशमुख, सुवर्णा मधुकर माळी, लक्ष्मी बालटे, सुवर्णा माळी, प्रदीप लांडगे, चंद्रकांत हाके, सर्जेराव राक्षे, संभाजीराव देशमुख, राहुल गुरव यांची प्रमुख उपस्थित होती. मुलीमध्ये प्रथम क्रमांक धनश्री गजानन गोडसे, द्वितीय क्रमांक स्नेहा सिध्देश्वर लवटे, तृतीय क्रमांक श्रावणी उमाकांत देशमुख यांनी मिळविला. ग्रामीण आटपाडी गटात प्रथम क्रमांक गोवर्धन आण्णासो जाधव, द्वितीय पांडुरंग विलास देशमुख, तृतीय हर्षवर्धन अनिल सागर यांचा आला.
 भवानी विद्यालय ते आण्णाभाऊ चौक, आबानगर, साईमंदिर, एस.टी बस स्थानक, मुख्यबजार पेठ ते बाजार पटांगण चौक ते यात्रा कमिटी व्यासपीठ अशी सायकल स्पर्धा झाली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies