डेंग्यूच्या तापाने शाळकरी मुलीचा मृत्यू. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

डेंग्यूच्या तापाने शाळकरी मुलीचा मृत्यू.

                                                                                     माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : गोंदीरा आटपाडी येथील शाळकरी मुलगी निकिता बाळासाहेब चव्हाण वय 15 हिचा डेंगू च्या तापाने मृत्यू झाला. काल पहाटे खाजगी रुग्णालयात तिचे निधन झाले. दिवाळीवेळी तिला ताप आला होता. पंढरपूर येथे मामाच्या गावाला गेल्यानंतर ती आजारी पडली होती. ताप येत असल्याने तिला आटपाडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 
आटपाडीतील राजारामबापू हायस्कूल मध्ये नववी मध्ये शिकत होती. डेंग्यूने रुग्णाचा मृत्यू झाल्याने काल आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन दक्षता घेण्यासंदर्भात उपाययोजना संदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी उमाकांत कदम, सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी बैठक घेऊन आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना स्वच्छता, तुंबलेली गटार कामे, पाण्याच्या टाक्या, घाण पाण्याचे डबके, नळा सभोवताच्या पाण्याचा खड्डा आदी डासांची निर्मिती ठिकाण संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या. डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरिया तापाचा प्रसार कसा थांबवता येईल, ताप टाळण्यासाठी सूचना केल्या.

No comments:

Post a Comment

Advertise