Type Here to Get Search Results !

समवेदना मेडिकल फाउंडेशनतर्फे विविध आजार तपासणी व मार्गदर्शन शिबीर




माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : समवेदना मेडिकल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यात प्रथमच रक्ताच्या तपासण्या, दिव्यांग सर्टिफिकेट, औषध योजनेचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९: ३० वाजता येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्त विकार तज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जरी तज्ञ या डॉक्टर उपस्थित राहून माहिती देणार असल्याची माहिती संवेदना मेडीकल फाऊंडेशनचे शहराध्यक्ष सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आजमितीला पालकांचा अज्ञानपणा व गरीब परिस्थितीमुळे उपचाराविना मुलांमध्ये वेगवेगळे आजार निर्माण होऊन स्प्लीन, लिव्हर, किडनी, डोळे, डोके, हृदय, हाडे खराब होण्याच्या मार्गावर असतात. अशा मुलांची जगण्याची क्षमता इतर मुलांपेक्षा कमी असते. या मुलावर वेळीच औषधोपचार केल्यास काही वर्षासाठी आयुष्यमान वाढते. परंतु आजार जिवंत असेपर्यंत रुग्णाच्या पाचवीला पुजलेला असतो. देशातील प्रत्येक सिव्हिलमध्ये या सुविधा सुरू व्हाव्यात तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी ५ जिल्ह्याकरिता एक सेंटर तयार केल्यास थैलेसिमिया, लुकेमिया, हिमोफिलिया, अप्लासिया, अप्लास्टिक अनिमिया, कॅन्सर यासारख्या आजारांवरील रुग्णांना उपचाराचा लाभ घेणे शक्य होईल, असे सचिन मोरे यांनी प्रारंभी सांगितले.
समवेदना मेडिकल फाउंडेशन, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल, अस्टर सीएमआय हॉस्पिटल आणि दातरी स्टेमसेल डोनरस, चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बोन मेरो मॅचिंग (एचएलए) व रक्ताची तपासणी, किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट, हँडीकॅप सर्टिफिकेट आणि मोफत औषध उपचार याबद्दलची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांबरोबरच बीड, उस्मानाबाद आणि विजापूरसह जवळच्या जिल्ह्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक बरकत पन्हाळकर यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस समवेदना मेडीकल फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष सचिन गुळग, तालुकाध्यक्ष रमेश आवताडे व लांडगे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies