फोन लावण्याचा बहाणा करून मोबाईल पळविला. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 16, 2019

फोन लावण्याचा बहाणा करून मोबाईल पळविला.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/ : तुमचा फोन मला द्या मला घरी फोन करायचे आहे असे म्हणून अज्ञात व्यक्तीने मोबाईल पळवून नेल्याची घटना फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रविंद्र लक्ष्मण लोखंडे (वय-५७) रा.५२, मंत्री चंडक रेसीडेन्सी, विजापूर रोड, सोलापूर यांना कोणीतरी एका अनोळखी इसमाने मला फोन लावायचा आहे तुमचा मोबाईल मला द्या. असे म्हणाला व त्यावेळी विश्वासाने फिर्यादीने मोबाईल फोन करण्यास दिला असता घर पणे फिर्यादीचा मोबाईल अज्ञात आरोपीने त्यांच्या फायद्यासाठी घेऊन गेला. हे घटना १३ नोव्हेंबर रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरा जवळ,दूध पंढरी, सोलापूर येथे घडली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक काळे हे करीत आहेत.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise