विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 27, 2019

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
 मुंबई :  महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालीदास निळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली असून त्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदि उपस्थित होते. यावेळी राज्यपाल यांनी श्री. कोळंबकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Advertise