Type Here to Get Search Results !

खानापूर नगरपंचायतमध्ये भारतीय संविधान दिन साजरा.

माणदेश एक्सप्रेस न्युज           
खानापूर/प्रतिनिधी : जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिवस खानापूर नगरपंचायतमध्ये साजरा करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य  सुहासनाना शिंदे, नगराध्यक्ष तुषार मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार आपण करूया असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, माजी नगराध्यक्ष अलीअकबर पिरजादे, राष्ट्रीय लहु शक्तीचे महाराष्ट्र सरचिटणीस संदिप ठोंबरे यांनी संविधान दिवसाचे महत्त्व सांगून व संविधान शपथ सर्वांना दिली. तसेच यावेळी व मुंबई येथे झालेल्या हल्लात शहीद झालेल्या हुतात्माना श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी सरपंच रायसिंग मंडले, बबन माने, राजेंद्र टिंगरे, भरत टिंगरे, सतिष भगत,  बहुजन सामाजिक संस्थेचे सचिव उमेश धेंडे, बाळासाहेब धेंडे, मिलिंद धेंडे, अमोल धेंडे, शक्ती धेंडे,  दत्तात्रय कांबळे, अतुल सावंत, सर्वेश मोरे, मनोहर ठोंबरे, प्रफुल्ल धेंडे, अशितोष धेंडे, सुरज धेडे, गणेश धेंडे अनिल कांबळे तसेच यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies