वाचन संस्कृतीने युवकांना जगण्याची ऊर्जा मिळेल : प्रा. जाधव. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

वाचन संस्कृतीने युवकांना जगण्याची ऊर्जा मिळेल : प्रा. जाधव.माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : वाचन संस्कृती जपली तर युवकांना जगण्याची खरी ऊर्जा मिळेल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक प्रा विश्विनाथ जाधव यांनी व्यक्त केला. आटपाडीतील विद्यानगर मधील मोफत वाचनालय आटपाडी येथे वाचक मेळावा ज्येष्ठ साहित्यिक प्रा विश्वंनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
माणदेशातील साहित्यिक व वाचक यांचा मेळावा घेऊन वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. नवोदित  साहित्य लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणे, माणदेशातील साहित्याची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, प्रत्येक महिन्याला वाचक बैठक घेऊन साहित्य, ग्रंथ, कविता या विषयावर चर्चा करण्याचे  ठरले.
माणदेशातील साहित्यांनी ग.दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना स इनामदार यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या साहित्याची परंपरा पुढे चालवण्यासाठी साहित्य वाचक रसिक यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे उपक्रम सातत्याने सुरू ठेवून वाचक चळवळ बळकट करण्याचा निर्णय झाला.
या बैठकीला प्रा विजय शिंदे, प्रा. बालाजी वाघमोडे, दिनेश देशमुख, प्रकाश नामदास, जेष्ठ कवी अरविंद चांडवले, मेघाताई पाटील,  कवी चंद्रवर्धन लांडगे, निलेश जुगदर यांनी मते मांडली. प्रकाश नामदास त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कुमार पाटील, तानाजी कोळेकर, सतीश कस्तुरे, योगेंद्र स्वामी, विनायक हिंगमिरे, दिग्विजय जावीर, शशिकांत पारशी, अनिल वाघमारे, अमोल सरगर, अंजली नामदास, विशाल इंगोले, राजेंद्र करचे, दिपक गायकवाड, शिवप्रसाद जवळे, शशांक राजमाने, दीपक खरात  यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.विजय शिंदे यांनी प्रास्ताविक, सतीश भिंगे यांनी स्वागत तर प्रकाश नामदास यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Advertise