Type Here to Get Search Results !

पूरबाधित क्षेत्रातील युवक, युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सांगली जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील युवक, युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देवून सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने प्रथम एज्युकेशन फौंडेशन, मुंबई या प्रशिक्षण संस्थेमार्फत कोल्हापूर व सातारा येथे १८ ते ४० वयोगटातील किमान ८ वी पास स्त्री / पुरूष उमेदवारांना निवासी प्रशिक्षण कोर्स मोफत देण्याचे नियोजित आहे. निवासी प्रशिक्षण कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवक / युवतींनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.
निवासी प्रशिक्षण कोर्स मोफत देण्याचे पुढीलप्रमाणे नियोजित आहे. ॲटो सर्व्हिस टेक्निशियन लेवल – ३ (४ व्हिलर मेकॅनिक) - हा कोर्स ८ वी पास पुरूषांसाठी असून प्रशिक्षण कालावधी २ महिने आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण कोल्हापूर येथे असून प्रशिक्षण सुरू दिनांक  १५ डिसेंबर २०१९, दि. १५ जानेवारी २०२० व दि. १ फेब्रुवारी २०२० असा आहे. ॲटो सर्व्हिस टेक्निशियन लेवल ४ (२ ॲण्ड ३ व्हिलर मेकॅनिक) - हा कोर्स ८ वी पास स्त्री / पुरूषांसाठी असून प्रशिक्षण कालावधी २ महिने आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण कोल्हापूर येथे असून प्रशिक्षण सुरू दिनांक  १५ डिसेंबर २०१९ (स्त्री), दि. ०१ जानेवारी २०२० (पुरूष) व दि. १ फेब्रुवारी २०२० (पुरूष) असा आहे. जनरल ड्युटी असिस्टंट (नर्सींग) - हा कोर्स ८ वी पास स्त्री साठी असून प्रशिक्षण कालावधी ३ महिने आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण कोल्हापूर येथे असून प्रशिक्षण सुरू दिनांक  १ डिसेंबर २०१९, दि. १ जानेवारी २०२० व दि. १५ जानेवारी २०२० असा आहे. असिस्टंट इलेक्ट्रिशियन - हा कोर्स ८ वी पास स्त्री / पुरूषांसाठी असून प्रशिक्षण कालावधी २ महिने आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण कोल्हापूर येथे असून प्रशिक्षण सुरू दिनांक  १ डिसेंबर २०१९, दि. १ जानेवारी २०२० व दि. १ फेब्रुवारी २०२० असा आहे. हाऊस किपींग,  फुड ॲण्ड बेवरेज व फुड प्रोडक्ट - हे कोर्स १० वी पास स्त्री / पुरूषांसाठी असून प्रशिक्षण कालावधी २ महिने आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण सातारा येथे असून प्रशिक्षण सुरू दिनांक  १ डिसेंबर २०१९, दि. १ जानेवारी २०२० व दि. १ फेब्रुवारी २०२० असा आहे.  अधिक माहितीसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies