डेंगू चिकुनगुन्या जनजागृतीबाबत मार्गदर्शन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

डेंगू चिकुनगुन्या जनजागृतीबाबत मार्गदर्शन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आटपाडी संचलित कला व विज्ञान महाविद्य़ालय आटपाडी, श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडी येथे शनिवार दि.23/11/2019 रोजी आटपाडी ग्रामपंचायत आटपाडी याच्यावतीने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये डेंगू, चिकुनगुन्या, मलेरिया व इतर साथीचे रोग याबाबत जनजागृती साठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आटपाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. वृषालीलीताई पाटील यांनी डेंग्यु, चिकुनगुन्या आणि मलेरिया कशामुळे होतो, डेंग्यु आणि चिकुनगुन्या रोगाची लक्षणे याबाबतची विद्यार्थ्याना माहिती दिली. 
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, डेंगू, चिकुनगुन्या, मलेरिया तापाचा प्रसार कसा थांबविण्यासाठी पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरेल, हौद, पिंप, हे झाकून ठेवावेत. पाण्याचे सर्व साठे किमान एकदा रिकामे करून कोरडे स्वच्छ करावेत. घराभौवतालचा परिसर स्वच्छ करावा. घराच्या आजूबाजूला गटारी असल्यास त्यावर जळके ऑईल टाकावे. त्यामुळे डेंगू, चिकुनगुन्या, मलेरिया नियंत्रित करण्यास मदत होईल. यावेळी आटपाडी ग्रामपंचायतचे उपसंरपच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर, अॅड. धंनजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी इतर कर्मचारी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आप्पा हातेकर यांनी केले.तर आभार प्रा.सुजित सपाटे यांनी मानले. यावेळी श्री.तानाजीराव पाटील बी.एड कॉलेजचे प्राचार्य राजू कोकरे, प्रा.अभिजीत गिरी मारूती हेगडे व महाविद्यायातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise