सावळज जि.प.साठी अमित देवकुळे आखाड्यात. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 28, 2019

सावळज जि.प.साठी अमित देवकुळे आखाड्यात.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
तासगाव/प्रतिनिधी : सावळज जि.प.पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात कोण कोण शड्डू ठोकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते अमित देवकुळे यांनी वंचीत बहुजन आघाडी मधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. वंचीत बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यास निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार असल्याची प्रतिक्रिया अमित देवकुळे यांनी दिली आहे. 
अमित देवकुळे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी भागातील विविध नागरी समस्यांवर आवाज उठविला आहे. बहुजन समाजातील अनेक प्रश्नावर आवाज उठवीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसंमान्याचे प्रश्न सोडावीत युवकांचेही चांगले संघटन उभारले आहे. त्यामुळे जनआशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. अमित देवकुळे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उगवते युवा नेतृत्व आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामगिरी चांगली आहे. त्यामुळेच अमित देवकुळे यांना वंचीतकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे बळावली आहे. त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर  प्रकाश आंबेडकर यांचेकडे फिल्डींग लावली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित मानली जात आहे. वंचित बहुजन आघाडीमधून अमित देवकुळे, गौतम कांबळे, सनी गायकवाडसह  इतर अनेकजण उमेदवारीसाठी धडपडत आहेत. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावीत देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे इतर पक्षाप्रमाणे वंचितमध्येही सावळज उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच चालू आहे. मात्र थोड्या दिवसातच पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हे उजेडात येईल.व इतरांचे मनसुबे उधळे जातील हे मात्र निश्चित आहे.

No comments:

Post a Comment

Advertise