सोन्याचे अमिष महिलेला पडले महागात. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

सोन्याचे अमिष महिलेला पडले महागात.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : सापडलेले सोने विकायचे आहे असे सांगत आपल्याकडचे खरे सोन्याचे मणी दाखवून, देताना मात्र बनावट पिवळ्या धातुचे मनी देत दोन महिलांनी मिळून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 
याबाबत आधिक माहिती अशी की, मिनाक्षी शरद गुळवे (वय ५८, रा़ केगाव, ता.उत्तर सोलापूर) कुंभार वेस येथून किराणा माल घेऊन घरी जात असताना मधला मारूती चौकामध्ये त्यांना दोन महिला भेटल्या. त्यांनी आपल्याकडे सापडलेले सोने आहे. ते विकायचे आहे. सोलापूरात सोनार आपल्या ओळखीचे नाही तुम्ही ओळख करून द्या म्हणून सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मिनाक्षी यांनी त्यांना घेऊन तेथे जवळ असलेल्या सोन्याच्या दुकानात घेऊन गेले. आणि तेथे त्या महिलांनी आपल्याकडे असलेले सोन्याचे मणी सोनारास दाखवत सोने खरे असल्याची खात्री करून घेतले. आणि दुकानातून बाहेर येऊन हे सोन्याचे मणी तुम्ही घ्या आणि तुमच्या कानातील बुगड्या आणि मंगळसुत्र द्या असे सांगितले. मिनाक्षी यांनी त्या महिलेवर विश्वास ठेवून सोन्याची अदलाबदली केली आणि घरी येऊन त्या महिलेने दिलेले सोने तपासले असता ते सोने नसून पिवळ्या कलरचे धातू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मिनाक्षी गुळवे यांनी याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी दोन अज्ञात महिलांनी आपली फसवणूक करत २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन गेल्याची म्हटले आहे. या फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राठोड हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise