मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न.माणदेश एक्सप्रेस न्युज 
नातेपुते/वार्ताहर : श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिर येथे रथोउत्सवानिमित्त अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात 722 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. तसेच 30 ते 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आले आहे. या शिबिरासाठी डॉ. राजेश फडे फलटण, डॉ.आदर्श मेहता सोलापूर,  डॉ. वैभव गांधी अकलूज, डॉ. अजिंक्य व्होरा नातेपुते, डॉ.निखिल फडे पुणे,  डॉ. नितीन लोंढे वालचंद नगर, डॉ. निखिल मिसाळ अकलूज  हे उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैभव गांधी होते. तसेच प. पू. 108  श्रमण मुनी श्री विनिश्चय सागर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयकुमार दोशी, डॉ. वैभव गांधी, नरेंद्र गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले.
यावेळी दहिगावचे सरपंच रणधीर पाटील, शिबीरदाता पृथ्वीराज दोशी, डॉ. उदयकुमार दोशी, डॉ. विकास शहा, अशोक दोशी, डॉ. वर्धमान दोशी, डॉ.प्रशांत गांधी, शीतल गांधी व मेडिकल असोसिएशन सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषध पुरवठा करण्यात आला. तसेच त्यागी भवन चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिरामध्ये स्वर्गवासी वैभवकुमार अनंतलाल दोशी यांच्या स्मरणार्थ संगीतमय शांतीनाथ विधान सौ. पद्मजा राजमहेंद्र अनंतलाल दोशी व दोशी परिवार यांच्यावतीने घेण्यात आले.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.


No comments:

Post a Comment

Advertise