शेतकरी मेळावा संपन्न; मापटेमळा येथे संकरित कावेरी मका पिकाची पाहणी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 28, 2019

शेतकरी मेळावा संपन्न; मापटेमळा येथे संकरित कावेरी मका पिकाची पाहणी.

आटपाडी/प्रतिनिधी :  मक्याचे चांगली गुणवत्ता व उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन मिलिंद पवार यांनी व्यक्त केले. मापटेमळा मापटेमळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महादेव बनसोडे (शेठ) यांच्या शेतात काल संकरित कावेरी मक्याचे उत्पादन संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष पिकाची पाहणी करण्यासाठी मेळावा झाला. आटपाडीच्या मंगलमुर्ती फळबाग संघ व भाजीपाला उत्पादक संघ उद्योग समूहाचे मालक पंढरीनाथ (नाना) नागणे  यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास कृषी सहाय्यक रवींद्र घुटुगडे, भिंगेवाडीचे कृषीतंत्र निकेतनचे प्राचार्य विशाल यादव, मंगलनाथ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिलिंद पवार म्हणाले, मक्यापासून 228 प्रकारचे उपपदार्थ बनवले जातात. मक्यास चांगली मागणी आहे. परदेशातून 3400 हजार टन मक्याची आयात केली जाते. अमेरिकेत 40 टन हेक्ट री मक्याचे उत्पादन होते. परंतु भारतात ७ ते८ टन मका उत्पादित केली जाते. त्यामुळे भारतात मक्याचे उत्पादन घटल्यामुळे परदेशातून मका आयात करण्याची वेळ आली आहे. मका उत्पादनाचे कावेरी 3712 बियाणे लागवड केल्यास त्याचे वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाने चांगले उत्पादन व गुणवत्ता यामुळे शेतकऱ्याला योग्य भाव मिळू शकेल असा विश्वास व्यक्त केला. महादेव बनसोडे (शेठ) यांनी अडीच महिन्यात उत्पादित केलेल्या मक्याचे कणसाची व पिकाची शेतकऱ्यांनी पाहणी केली. या मेळाव्यात मापटेमळाचे सरपंच रघुनाथ माळी, मंगलनाथ देशमुख, राजेंद्र राजमाने, विजयकुमार माळी, दत्तात्रय बनसोडे, धनाजी खिलारी, नानासाहेब माळी, कृष्णा होळे, शशिकांत सागर, अजित भिंगे, महादेव जाधव यावेळी उपस्थित होते. पंढरीनाथ नागणे यांनी प्रास्ताविक केले. महादेव बनसोडे यांनी स्वागत केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise