सुहासनाना शिंदे यांचे हस्ते घरकुल लाभार्थीना धनादेश वाटप कार्यक्रम. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

सुहासनाना शिंदे यांचे हस्ते घरकुल लाभार्थीना धनादेश वाटप कार्यक्रम.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
खानापूर/वार्ताहर : खानापूर नगरपंचायत खानापूरच्या वतीने रमाबाई आवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थींनी पहिला  धनादेश रुपये १ लाख २५ हजार रु. प्रदान सोहळा कार्यक्रम माजी जि.प. सदस्य सुहासनाना शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तुषार मंडले आहेत.
कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर माजी पं.स. सदस्य पांडुरंगतात्या डोंगरे, चेअरमन महेश माने, डॉ. उदय हजारे, माजी नगराध्यक्ष अलीअकबर पिरजादे, माजी नगराध्यक्ष सौ. भारती बबन माने, माजी उपनगराध्यक्ष सौ. स्वाती राजेंद्र टिंगरे, सुनिता सदाशिव भगत यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम आज दि. २९ रोजी स. ९.३० वा. बौध्द सामाजिक सभागृह खानापूर येथे संपन्न होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise