सोने व कारची मागणी ; माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या कन्येचा छळ. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 25, 2019

सोने व कारची मागणी ; माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या कन्येचा छळ.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : माहेरून सोने आणि चार चाकी वाहन आण, असा तगादा लावून सासरच्या मंडळींनी केलेल्या छळास कंटाळून पूजा दिनेश कांबळे (वय-२३ वर्षे) हिने पोलिसांत फिर्याद दाखल केली. हा प्रकार नांदेड येथे मार्च २०१५ पासून जून २०१९ पर्यंत सातत्याने घडला. पूजाचे वडील सलग १५ वर्षे आमदार तसेच ५ वर्ष राज्याचे राज्य मंत्री होते. ती माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची सुकन्या असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील दक्षिण सदर बझार, मौलाली चौक, शिक्षक सोसायटीतील माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची कन्या पुजा हिचा विवाह, मार्च २०१५ मध्ये हिंदु चालीरितीप्रमाणे दिनेश खंडेराय कांबळे (रा.नांदेड) याच्याशी झालेला आहे. पूजाला सासरच्या मंडळींनी केवळ पंधरा दिवस व्यवस्थित नोंदविल्यानंतर माहेरून सोने आणि कार घेऊन ये, असा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पूजाची सासरची मंडळी तिला तुझे वडील राज्यमंत्री होते. तीन टर्म आमदार होते. आम्हाला साधी कारसुध्दा दिली नाही, या कारणावरुन फिर्यादीस टोचून बोलणे, उपाशी ठेवणे, फिर्यादीस त्यांचे माहेरी फोन लावू देत नव्हते, तसेच वरील आरोपी यांनी संगनमताने माहेरून सोने व कार (चार चाकी वाहन) याची मागणी करून वेळोवेळी संगनमत करुन जून २०१९ पर्यंत मानसिक त्रास देवून, शिवीगाळ करुन व मारहाण केली. या छळास कंटाळून पूजा दिनेश कांबळे हिने सासरच्या मंडळींविरुद्ध येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीनुसार तिचे सासरे खंडेराव हैबत्ती कांबळे (वय-६० वर्षे), पती दिनेश खंडेराव कांबळे (वय-२८ वर्षे) आणि सासू शारदा खंडेराव कांबळे (वय-५५ वर्षे, सर्व रा. ममता निवास, खुशालसिंग नगर, हिंगोली नाका, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल/१२७७ काळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise