Type Here to Get Search Results !

धांडोरमळा जि.प. शाळेत बालदिन साजरा





माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर : जि.प. शाळा धांडोरमळा येथील शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांनी मिळून केक कापला तर मुलांना केक व खाऊ वाटप करण्यात आले.
उन्नती महिला फौंडेशनच्या अध्यक्षा अनिता पाटील यांनी बालकांना मार्गदशन केले. यावेळी त्या म्हणाल्या, चाचा नेहरू यांना लहान मुलांचा फार लळा होता. मुले त्यांना चाचा नेहरू या नावाने हाक मारत असत. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाल दिन साजरा केला जातो .तसेच मुलांनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे असे आवर्जून सांगितले. यावेळी शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies