गहिनीनाथ वाघंबरे व श्रीमंत बनकर यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 16, 2019

गहिनीनाथ वाघंबरे व श्रीमंत बनकर यांची निवडमाणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या माळशिरस शहर पत्रकार संघाच्या बैठकीत माळशिरस शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ वाघंबरे, उपाध्यक्षपदी श्रीमंत बनकर, कार्याध्यक्षपदी आनंद शेंडगे, सचिवपदी लक्ष्मण वाघमोडे, खजिनदारपदी शौकत पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पत्रकार संघाचे मार्गदर्शक अशोक सिदवाडकर व अनंत दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी कार्यकारणी सदस्य संजय देशमुख, संजय हुलगे, बंडू पालवे, सोहेल पठाण, निर्मला मदने हे उपस्थित होते. निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान मार्गदर्शक यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार नंतर नूतन अध्यक्ष गहिनीनाथ वाघंबरे म्हणाले, शहर कार्यकरणीची स्थापना २००९ मध्येच झाली असून, सुरुवातीच्या चार ते पाच वर्षामध्ये तत्कालीन कार्यकारणीने विशेष उपक्रम राबिवले होते. त्याच प्रमाणे नूतन कार्यकारणी सर्वांना विश्वासात घेऊन विविध उपक्रम राबविणार आहे. नुकताच राज्यामध्ये शासनाने पत्रकारासाठी संरक्षण कायदा लागू केला आहे. यासाठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष एस.एम देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असून लवकरच त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम माळशिरस येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा..  

No comments:

Post a Comment

Advertise