Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर गॅस टाक्यांचा साठा ; १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : जीवितास धोका निर्माण करून जास्त टाक्यांचा बेकायदेशीर रीत्या विनापरवाना वापर तिघा जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धेश्वर गांधीनगर, सोलापूर येथे, सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला विनापरवाना व बेकायदेशीररीत्या रिक्षामध्ये घरगुती गॅस भरणे सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. व त्या ठिकाणी होऊन दोन हजार रुपयांची एक गॅस टाकी, तीन हजार रुपयांचा एक फिकट रंगाचा इलेक्ट्रिक वजन काटा,  इलेक्ट्रिक मोटार, १ लाख ५० हजार रुपयांची एम.एच. १३ सीटी.३१५१ क्रमांकाची रिक्षा, व ५०० रुपयांचे इलेक्ट्रिक बोर्ड असा एकूण १ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, आरोपी सोहेल जावेद अलमेलकर,रा. नई जिंदगी, सोलापूर, म.गौस म. इस्माईल शेख रा . प्लॉट ४५, सिद्धेश्वर गांधी नगर,सोलापुर, महेबुब सलीम जहागीरदार रा. सिद्धेश्ववर नगर, भाग-४, सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळूंखे हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies