सुनंदाताई भोस यांचे आज व्याख्यान. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

सुनंदाताई भोस यांचे आज व्याख्यान.


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आटपाडी आयोजित  संविधान जनजागृती सप्ताहानिमित्त आज अहमदनगर येथील प्रसिद्ध व्याख्यात्या सुनंदाताई भोस यांचे “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान” या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक हे आहेत.
विचार मंचच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी संविधान सप्ताहानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. आज दिनांक 22  रोजी अहमदनगर येथील सुनंदाताई भोस यांचे व्याख्यान आटपाडी शहरातील राजारामबापू हायस्कूलच्या  भव्य पटांगणावर सांय. ६ ते  ९  या वेळेत होत असून व्याख्यानानंतर भोजनदान होणार आहे.  व्याख्यानासाठी आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विचारमचंचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे. तर सदरचे व्याख्यान हे दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या युट्युब चॅनेल व फेसबुक पेज वरती लाइव्ह सुद्धा करण्यात येणार असल्याने दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या युट्युब चॅनेल लाईक, शेअर व सबक्राईब करा तसेच फेसबुक पेज ला फॉलो करा.
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whatsapp group मध्ये join होण्यासाठी click करा.

No comments:

Post a Comment

Advertise