लाच घेताना केंद्रप्रमुख अशोक माने व मुख्याध्यापक प्रमोद सुर्यवंशी यांना अटक; तक्रारदार यांचेकडे मागील पगार काढण्यासाठी केली होती १० हजार लाचेची मागणी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

लाच घेताना केंद्रप्रमुख अशोक माने व मुख्याध्यापक प्रमोद सुर्यवंशी यांना अटक; तक्रारदार यांचेकडे मागील पगार काढण्यासाठी केली होती १० हजार लाचेची मागणी.
आटपाडी/प्रतिनिधी : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नेलकरंजी ता. आटपाडी जि. सांगली येथील केंद्र प्रमुख कार्यालयातील केंद्र प्रमुख अशोक पांडुरंग माने व जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा नेलकरंजीचे मुख्याध्यापक प्रमोद मुरलीधर सुर्यवंशी यांना १०,०००/- रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले असून सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे.
याबात अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील प्राथमिक सह शिक्षक असून माहे सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचेवर गुन्हा दाखल झालेने ते सध्या निलंबीत असून त्यांचा माहे सप्टेंबर २०१८ मधील थकीत असलेला पगार काढून देण्याकरता केंद्र प्रमुख कार्यालयातील केंद्र प्रमुख अशोक पांडुरंग माने यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी दि.२१.११.२०१९ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये केंद्र प्रमुख अशोक पांडुरंग माने यांनी तक्रारदार यांच्याकडे १०,०००/- रूपये लाचेची मागणी करून जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नेलकरंजी येथील मुख्याध्यापक प्रमोद मुरलीधर सूर्यवंशी यांचेकडे आणून देण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लागलीच जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नेलकरंजी येथे सापळा लावला असता केंद्र प्रमुख अशोक पांडुरंग माने वय ५६ वर्ष यांचे सांगणेवरून मुख्याध्यापक प्रमोद मुरलीधर सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपये लाचेची रक्कम मागणी करून लाचेची रककम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याअनुषंगाने केंद्र प्रमुख अशोक पांडुरंग माने व मुख्याध्यापक प्रमोद मुरलीधर सुर्यवंशी यांचे विरुध्द आटपाडी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, व श्रीमती सुषमा चव्हाण अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र साळुखे पोलीस उप अधीक्षक तसेच गरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी, संजय कलक्टगी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, अश्विनी कुकडे, राधिका माने, बाळासाहेब पवार यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास 
पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा. 
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whatsapp group मध्ये join होण्यासाठी click करा.

No comments:

Post a Comment

Advertise