घरात कोणी नसल्याचा फायदा घेत लॅपटॉपची चोरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 12, 2019

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत लॅपटॉपची चोरी
सोलापूर/प्रतिनिधी : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील उघड्या दरवाजातून चोराने प्रवेश करून लॅपटॉप चोरून नेल्याची घटना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजश्री रमेश गायकवाड (वय-२३) रा.१०, पद्माजंली कॉम्प्लेक्स, तिसरा मजला मोदी, सोलापूर यांच्या घरात घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने प्रवेश केला. व कुणी नसल्याचे पाहून वीस हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप मुद्दामून लबाडीने राहत्या घरातून चोरून नेला. हे घटना ७ नोव्हेंबर रोजी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून, अनोळखी इसमाचा वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत.
दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा.


No comments:

Post a Comment

Advertise