पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणीची 9 डिसेंबर पर्यंत मतदार नोंदणी करा : श्रीमंत कोकाटे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 18, 2019

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणीची 9 डिसेंबर पर्यंत मतदार नोंदणी करा : श्रीमंत कोकाटे.माणदेश एक्सप्रेस न्युज 
पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नावनोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पदवीधरांनी आपला मतदान हक्क बजावण्यासाठी ही मतदार नावनोंदणी आवश्यक आहे. तरी अधिकाधिक पदवीधरांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रसिद्ध शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले आहे. 
पुणे  विभाग पदवीधर मतदार नाव नोंदणी सुरू आहे. 9 डिसेंबर नोंदणीची अंतिम तारीख आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पुर्वीचे पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची मार्कशीट झेरॉक्स प्रत. पासपोर्ट साईज फोटो. मतदार ओळखपत्र झेरॉक्स प्रत.आधार कार्ड/ रेशन कार्ड/ रहिवाशी दाखला/ लाईट बिल यापैकी एक अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिकाधिक पदवीधरांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असे ते म्हणाले. 
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा

No comments:

Post a Comment

Advertise