प्रशिक्षण फी प्रलंबित असलेल्या संस्थानी 30 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

प्रशिक्षण फी प्रलंबित असलेल्या संस्थानी 30 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2003-04 ते 2005-06 या वित्तीय वर्षात मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांसाठी विविध विषयाच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात आली होती. ज्या प्रशिक्षण संस्थानी ही योजना यशस्वी राबविली आहे व त्यांची प्रशिक्षण फी महामंडळाकडे प्रलंबित आहे त्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल. ए. क्षीरसागर यांनी केले आहे. 
श्री. क्षीरसागर म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध प्रशिक्षण संस्थाना मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांसाठी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती. मंजूरीनंतर ज्या प्रशिक्षण संस्थानी महामंडळाची प्रशिक्षण योजना यशस्वी राबविली आहे व त्यांची प्रशिक्षण फी महामंडळाकडे प्रलंबित आहे अशा संस्थांची सन 2003-04 ते 2005-06 या कालावधीतील प्रलंबित प्रशिक्षण फी अदा करण्याची कार्यवाही मुख्यालयामार्फत चालू आहे.
प्रशिक्षण संस्थाची सन 2003-04 ते 2005-06 या कालावधीतील प्रशिक्षण फी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे प्रलंबित आहे, त्या संस्थानी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रासह महामंडळाच्या जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, रेल्वे क्रॉसींगजवळ, संभाजीनगर, सांगली येथे दि. 30 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रलंबित फी मागणीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे श्री. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise