दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवावेत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवावेत.माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : भारत सरकारच्याजलशक्ती मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या मार्फत जलसंधारण संदर्भात जनजागृतीस प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कार 2019 ची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय जलपारितोषिके हे उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपालिका, पंचायत समिती, गाव, ग्रामपंचायत, शाळा, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, वर्तमानपत्र इत्यादींना देण्यात येणार आहेत. 
पुरस्कार निवड निकषानुसार राज्य शासनामार्फत जल वापरासंदर्भात निगडीत असलेल्या जलसंपदा, जलसंधारण, कृषी, उद्योग विभागामार्फत या क्षेत्रात करण्यात आलेल्या विशेष कार्याची माहिती, चित्रफीत (व्हिडिओ) याचा समावेश असणारा सर्वसमावेशक प्रस्ताव दि. 19 नोव्हेंबर 2019 पर्यंत विभागास सादर करावा. तसेच राष्ट्रीय जल पारितोषिकांपैकी ‘उत्कृष्ठ राज्य’ या पुरस्कारासाठी जलसंपदा, जलसंधारण, कृषी, उद्योग विभागाच्यावतीने राज्य शासनामार्फत दि. 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी प्रसताव पाठवावेत, तसेच अन्य विषयासंदर्भातील पारितोषिकांसाठी संबंधित विभागाने त्यांचे प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयास परस्पर पाठवावे, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.No comments:

Post a Comment

Advertise