१० हजार कोटी अपुरे, 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी : अजित पवार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 3, 2019

१० हजार कोटी अपुरे, 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी : अजित पवार


१० हजार कोटी अपुरे, 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी : अजित पवार
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी सरकारकडून 10 कोटींच्या मदतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र 10 हजार कोटींची मदत पुरेशी नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं असून शेतकऱ्यांना २५ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करावी असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? सरकारला कल्पना नाही, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे. नुकसानीचा अंदाज घेतला तर कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणार आहेत. 10 हजार कोटी कशालाच पुरणार नाही. सरकारची मदत अपुरी आहे. राज्य सरकारने 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
सरसकट अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. या संदर्भातलं ट्वीट त्यांनी केलं आहे. पंकजा मुंडेंच्या मागणीवर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, त्या काळजीवाहू मंत्री आहेत, सूचना काय करत आहेत. कातडी बचाव भूमिका कशी चालेल? असा सवाल अजित पवारांनी विचारला.
फोटो अजित पवार 

No comments:

Post a Comment

Advertise