आटपाडीच्या राजाराम देशमुख यांचा खानापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 5, 2019

आटपाडीच्या राजाराम देशमुख यांचा खानापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी खानापूर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज काल दि. ४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवा नेते मोहन खरात जयंत देशमुख, आशिष देशमुख, सुभास पाटील दत्ता देशमुख, अतुल देशमुख, निखील इनामदार, सचिन कुंभार, गणेश राक्षे, गणेश देशमुख, अक्षय देशमुख, सुमंत्र डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली वर्षभरापासून राजाराम देशमुख यांनी मतदार संघामध्ये आपला संपर्क दौरा सुरु केला असून त्यांनी विविद कार्यक्रमाद्वारे आपण खानापूर विधानसभा लढविणार असल्याचे ते सांगत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचाच आमदार झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती व त्याबाबत दि. ३ रोजी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व आटपाडी तालुक्यातील नागरीकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत तालुक्यातील नागरिकांनी व नेत्यांनी आटपाडी तालुक्याचा आमदार झाला पाहिजे त्यासाठी माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व अमरसिंह देशमुख यांची नावे पुढे केली होती. परंतु अमरसिंह देशमुख यांनी मात्र आमच्या घरातील कोणीहि निवडणुकीसाठी उभा राहणार नाही असा पवित्रा घेतला होता. 
आटपाडी तालुक्यातून आता मात्र राजाराम देशमुख यांनी अर्ज दाखल केला असून ते राजकीय व आर्थिक दृष्ट्या कणखर असून देशमुख बंधू यांनी त्यांना पाठींबा  दिल्यास आटपाडीचा आमदार होण्यास काहीही हरकत नाही असे मतदारामधून सध्या चर्चा होवू लागली आहे.  

No comments:

Post a Comment

Advertise