बीएसपी मधून संतोष हेगडे यांचा खानापूर मतदान संघातून उमेदवारी अर्ज दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 4, 2019

बीएसपी मधून संतोष हेगडे यांचा खानापूर मतदान संघातून उमेदवारी अर्ज दाखल

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
राजेवाडी/देवानंद जावीर : बहुजन समाज पार्टी चे अधिकृत उमेदवार संतोष सुखदेव हेगडे यांनी दि. 3 रोजी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बीएसपीचे सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांनी प्रमुख उपस्थिती होती.
संतोष हेगडे हे आवळाई गावचे सर्व बहुजन समाजाचे कार्य करणारे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत. गेली पाच वर्षे समाजकार्य कार्यात स्वतःला गुंतवून अनेक समाज बांधवांना आंबेडकर फुले शाहू आंबेडकर यांची यांच्या विचार धारेच्या जोरावर न्याय मिळवून दिला आहे. 
बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांच्या माध्यमातून संतोष हेगडे यांनी आपले सहकारी  देवानंद जावीर, मोहन जावीर, संजय हेगडे, अनिल हेगडे यांच्या सहकार्याने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise