शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे यांचा सदाशिवराव पाटील यांना पाठिंबा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 9, 2019

शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे यांचा सदाशिवराव पाटील यांना पाठिंबा

माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा : शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज रघुनाथ ठिगळे यांनी २८६ खानापुर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
यावेळी भक्तराज ठिगळे म्हणाले, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खानापूर  मतदार संघाचे कर्तृत्ववान नेतृत्व सदाशिवभाऊ पाटील यांच्या पाठीशी शेतकरी सेना ठामपणे उभे राहणार असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. सदाभाऊ हे सक्षम उमेदवार असल्यामुळे  मी माझी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करत आहे. पाटील यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मी व माझे कार्यकर्ते भाऊंना पाठिंबा जाहीर करीत आहोत. 
याप्रसंगी खानापूर तालुका अध्यक्ष भागवत सुतार,  उपाध्यक्ष महादेव मोहिते,  संदीप जाधव तसेच संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise