Type Here to Get Search Results !

सिद्धनाथ हायस्कूल म्हसवडचे तालुकास्तरीय मैदानी खेळाच्या स्पर्धेत यश १० खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड/अहमद मुल्ला :  दहिवडी येथे नुकत्याच  तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूलच्या  १० खेळाडूंची जिल्हास्तरावरील स्पर्धेकरीता निवड झाली. निवड झालेले खेळाडू व खेळाचे प्रकार पुढील प्रमाणे  १९ वर्ष वयोगटात १)अक्षता खाडे प्रथम क्रमांक  ३०० मिटर धावणे २)कु.प्रियांका शिंदे तिसरा क्रमांक  ३०० मिटर धावणे, ३)कु माधुरी शिंदे प्रथम क्रमांक १०० मिटर हार्डल्स ४)कु.शिवानी भोसले  व नम्रता खाडे प्रथम क्रमांक रिले ४*४०० मिटर ५) क्रृषिकेश आटपाडकर भालाफेक दुसरा क्रमांक ६)कु.पुजा पिसे तिसरा क्रमांक भालाफेक,   १७ वर्ष वयोगटात १) कु.स्वाती ठोंबरे १०० मिटर धावणे  दुसरा क्रमांक २)अविनाश शिंगाडे २०० मिटर धावणे प्रथम क्रमांक ३) रोहन कोळेकर ८०० मिटर धावणे दुसरा क्रमांक मिळवला.
तालुकास्तरीय स्पर्धा पार पाडण्यासाठी महेश बडवे तालुका क्रिडा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली सिद्धनाथ हायस्कूलचे क्रिडा शिक्षक उत्तमराव पोळ, मारुती लोखंडे यांनी सहकार्य केले. फलटण एज्यु.सोसायटीचे ग.कौ.सदस्य पृथ्वीराज राजेमाने, स्कूल कमिटी सदस्य नितीनशेठ दोशी, प्राचार्य एम.जी. नाळे सर्व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे  व क्रिडा शिक्षक यु.बी.पोळ व एम.एल लोखंडे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies