Type Here to Get Search Results !

ग.दि. माडगूळकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने माडगुळेत रक्तदान शिबिर संपन्न


माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
माडगुळे/नंदकुमार विभूते : माडगुळे येथील ग.दि. माडगूळकर नवरात्र उत्सव मंडळाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सांगोला येथील रेवनील ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले. रक्तदात्यास अल्पोपहार व गिफ्ट तसेच प्रमाणपत्रही देण्यात आले. 
यावेळी माडगुळे गावचे सरपंच संजय विभुते. ग्रामपंचायत सदस्य उद्धव विभुते, कामगार कल्याण केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच भारत विभुते व गावातील तरुण वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies