शिक्षकांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा हा शिक्षक बांधवांसाठी प्रेरणादायी :विजयराव गायकवाड; अहिल्या शिक्षण संस्थेतील सेवा निवृत्त सेवकांचा सेवानिवृत्तपर सत्कार सोहळा संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 8, 2019

शिक्षकांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा हा शिक्षक बांधवांसाठी प्रेरणादायी :विजयराव गायकवाड; अहिल्या शिक्षण संस्थेतील सेवा निवृत्त सेवकांचा सेवानिवृत्तपर सत्कार सोहळा संपन्न


माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : समाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या शिक्षक बांधवांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा हा शिक्षण क्षेत्रात नव्याने शिक्षक म्हणून काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
ते विरकरवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रागंणात महाराणीदेवी आहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या विविध शाखातील कर्मचारी सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे होते, यावेळी संस्थेचे सचिव एस.ए.पाटील, संस्था समन्वय समितीचे कार्यवाह बी.पी.सरगर, खजिनदार संपतराव अनुसे, जेष्ठ सल्लागार एस.के.कदम, नगरसेवक दिपक बनगर, माजी नगरसेवक ईश्वरा खोत, नबाजी विरकर, माजी.  केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर, संस्थेचे जेष्ठ संचालक जे.ए.माने, पी.बी.स्वामी, पी.डी.स्वामी, ए.एस.पडळकर, एस.एन.विरकर, माण तालुका मुख्याध्यापक संघटनचे जाधव सर, पवार सर व गोरड सर याचं बरोबर संस्थेच्या विविध शाखेतील मुख्याध्यापक, शिक्षक  इतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, अहिल्याबाई शिक्षण संस्थेने शिक्षक केंद्र बिंदू मानून शिक्षण संस्थेची घोडदौड सुरू ठेवली आहे. संस्थेने तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवून खऱ्या अर्थाने शिक्षण क्रांती केली आहे. हे क्रांतीचे शिवधनुष्य सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्तमरितीने पेलणाऱ्या सेवाकांचा सेवा निवृत्ती सत्कार करून खऱ्या अर्थाने संस्थेने कृतज्ञता व्यक्त केल्याचे म्हटले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. स्वागत गीत व विश्व प्रार्थनेने  मान्यवरांचे शाब्दिक  स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवातकरण्यात आली. पुळकोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार शेळके, ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे सहशिक्षक विठ्ठल सजगाणे, लिपीक नानासाहेब मासाळ, सेविका श्रीमती सुनिता सुर्यवंशी त्याचबरोबर विरकरवाडी हायस्कूलचे लिपिक लालासाहेब मासाळ आदी कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संस्था व शाखेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला.
 कार्यक्रमाच्या दरम्यान विरकरवाडी हायस्कूलचा माजी विद्यार्थी कु.अमित दत्तू विरकर या विद्यार्थ्यांने स्पर्धा परिक्षेतून 'गुप्त वार्ता अधिकारी' हे पद संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव एस.ए.पाटील यांनी केले. शिक्षक मनोगत आर.टी. काळेल व अश्विनी मासाळ यांनी तर विद्यार्थी मनोगत कोमल गलंडे यांनी व्यक्त केले. तसेच सत्कार उत्तर म्हणून नंदकुमार शेळके व विठ्ठल सजगाणे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एम. वाघमारे व प्रा. संध्या जानकर यांनी केले. तर आभार जी.डी.मासाळ यांनी मानले.  
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन.विरकर, पुळकोटीचे मुख्याध्यापक आर.पी.चवरे, विरकरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी पांढरे सर आदीसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षण प्रवाहात आणून चांगला माणूस म्हणून स्वतःच्या पायावर उभा करण्याचे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून ते उद्दिष्ट आज पूर्णत्वाकडे जात असल्याचे चित्र समाजात पहावयाला मिळत आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रशासकीय सेवेसह प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे.
आर.एस.चोपडे सर
चेअरमन, महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगली. 

No comments:

Post a Comment

Advertise