Type Here to Get Search Results !

रत्नत्रय पतसंस्थेची एटीएम कार्ड सेवा चालू


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस येथील रत्नत्रय पतसंस्थेची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू असून चालू वर्षी संस्थेने सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक श्री अनंतलाल दोशी यांनी संस्थेच्या 15 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, व्हाईस चेअरमन संजय गांधी, संचालक सुरेश कुलकर्णी, प्रमोद दोशी, अजय गांधी, दत्तात्रय वाघोले, रामदास गोफने, अनघा गांधी, अनिता दोशी, सचिव ज्ञानेश  राऊत यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या व तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व  आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. पुढे बोलताना दोशी म्हणाले, या पतसंस्थेची स्थापना परिसरातील छोट्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे व त्यांची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आले आहे. या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद, ठेवीदार, संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे. आर्थिक व्यवहारा  बरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्य करून समाजसेवा करीत आहे. 
संस्थेने आयसीआयसीआय बँकेशी टाईप होऊन एटीएम कार्ड चालू केलेले आहे. त्याचे वाटप संस्थापक दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्रमोद दोशी यांनी केले. संस्था देत असलेल्या सेवेंचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. संस्थेमार्फत सभासदांना भारतात कोठेही आरटीजीएस, एनएफटी करण्याची सेवा, डीडी काढण्याची सेवा, लाईट बिल व फोन बिल भरण्याची सेवा सर्व वाहनाचा इन्शुरन्स काढण्याची सेवा या सर्व सेवा चालू केलेल्या आहेत. तरी या सेवेचा सभासदांनी ठेवीदारांनी लाभ घ्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले. 31 मार्च 2019 अखेर संस्थेकडे 11 कोटी 8 लाख 14 हजार 260 रकमेच्या ठेवी आहेत. 9 कोटी 14 लाख 36 हजार 211 कर्ज वाटप आहे. तसेच 43 लाख 32 हजार 301 भांडवल आहे. एक कोटी 52 लाख 23 हजार 902 उत्पन्न असून एक कोटी 32 लाख 95 हजार 145 संस्थेचा खर्च आहे. संस्थेला चालू वर्षी 19 लाख 28 हजार 757 इतका नफा झालेला आहे. संस्थेला गेल्या पंधरा वर्षापासून ऑडिट वर्ग मिळत अ आहे. व संस्थेने स्थापनेपासून 15 टक्के लाभांश सभासदांना दिला आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
तर सचिव ज्ञानेश राऊत यांनी संस्थेचे सभे पुढील  विषय वाचन करून संस्थेच्या आर्थिक पत्रकाची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेळेवर येणाऱ्या सभासदां मधून लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक सौ लता पालवे, द्वितीय  क्रमांक ललिता राऊत, तृतीय क्रमांक नंदकुमार राजमाने यांना बक्षिसे लागली. तसेच सर्व हजार सभासदांना एक बॅग भेटवस्तू देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव मोडसे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies