शाळा सुधारण्यासाठी गावाने एकत्रित योगदान द्यावे-सौ.सोनालीताई पोळ; धुळदेव जि.प. शाळेला संरक्षण भिंत बांधकामाचा प्रारंभ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 11, 2019

शाळा सुधारण्यासाठी गावाने एकत्रित योगदान द्यावे-सौ.सोनालीताई पोळ; धुळदेव जि.प. शाळेला संरक्षण भिंत बांधकामाचा प्रारंभ


माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने गावातील शाळा सुधारण्यासाठी एकत्रित योगदान द्यावे असे आवाहन  जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनालीताई पोळ यांनी केले. धुळदेव ता.माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारास सौ.पोळ यांच्या स्थनिक विकासनिधीतून मंजूर करण्यात आलेल्या संरक्षक भिंत बांधकामाचा प्रारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच मारुती कोळेकर, माजी सरपंच श्रीमंत कोळेकर, दादा कोळेकर, देविदास कोळेकर, प्रताप कोळेकर, प्रदिप कोळेकर, गोकुळसिंह चंदिले, तुकाराम शेलार, इत्यादी उपस्थितीत होते. 
सौ. सोनालीताई पोळ पुढे म्हणाल्या, माण तालुक्यात बुध्दीचा सुकाळ असल्याने प्रत्येक ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून गावाचा नावलौकिक मिळविण्यास प्रयत्न करावेत. या कार्यक्रमानंतर त्यांनी शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमाची पाहणी केली. तालुक्यातील उत्तम असणाऱ्या परसबागेचे तोंडभरुन कौतुक केले. त्याचबरोबर तालुक्यात दुष्काळ असतानाही शाळेने वृक्षारोपणात केलेले भरीव काम, भौतिक सुविधा याविषयी समाधान व्यक्त केले. 
याप्रसंगी या शाळेचे शिक्षक राजाराम तोरणे, श्रीमंत कोळेकर, दिपककुमार पतंगे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन, तर जावेद मुल्ला यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Advertise