केबल दूरचित्रवाणीवरून जाहिरातीसाठी परवानगी आवश्यक: जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 22, 2019

केबल दूरचित्रवाणीवरून जाहिरातीसाठी परवानगी आवश्यक: जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीमाणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता  दिनांक 21 सप्टेंबर 2019 पासून लागू झाली आहे. निवडणूक काळात केबल टी.व्ही. वरून निवडणुकीच्या संदर्भात जाहिरात / उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार केला जातो. सदर केबल दूरचित्रवाणी वरून करण्यात येणाऱ्या जाहिराती / प्रचार यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127 मधील तरतुदीनुसार परवानगी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, केबल टेलीव्हीजन ॲक्ट 1955 मधील तरतुदीनुसार कोणतेही प्रसारण करण्यापूर्वी संबंधित प्राधिकारण यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाकडील स्पेशल केस क्र. 6679/04 दिनांक 23 एप्रिल 2004 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील आदेश क्र. 509/75/2004/जेएस-1 दि. 15 एप्रिल 2004 मधील सूचनेप्रमाणे निवडणुकीच्या संदर्भात दूरचित्रवाणीवरून कोणत्याही प्रकारचे प्रसारण करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची मान्यता घेण्यात यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास अथवा मान्यता घेता जाहिराती / प्रचार केल्याचे निदर्शनास आल्यास आदर्श आचार संहितेमधील मागदर्शक सूचनेप्रमाणे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise