महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी; निवडणूक आयोगाची घोषणा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 21, 2019

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी; निवडणूक आयोगाची घोषणा


नवी दिल्लीः यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.


निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख -२ ७ सप्टेंबर २०१९
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ४ ऑक्टोबर २०१९
उमेदवारी अर्जांची छाननी-५ ऑक्टोबर २०१९
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत - ७ ऑक्टोबर २०१९
मतदान-२१ ऑक्टोबर २०१९
मतमोजणी-२४ ऑक्टोबर २०१९

No comments:

Post a Comment

Advertise