नेहरू युवा केंद्राच्या वक्तृत्व स्पर्धेत विश्वजीत पवार प्रथम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 21, 2019

नेहरू युवा केंद्राच्या वक्तृत्व स्पर्धेत विश्वजीत पवार प्रथम


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : नेहरू युवा केंद्र सांगलीच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी आष्टा येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत पलूस तालुक्यातील आंधळी येथील विश्वजीत विलास पवार यांने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता श्री. तारळेकर, विभाग प्रमुख जी. आर. कुलकर्णी, नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी संजय कुरणे यांच्याहस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत व्दितीय क्रमांक निहारिका हेमंत शेट्टी, सांगली व तृतीय क्रमांक स्नेहल शशिकांत माळी, सांगली यांनी पटकावला. विजेत्यांना प्रथम क्रमांकास 5 हजार, व्दितीय क्रमांकास 2 हजार व तृतीय क्रमांकास 1 हजार रूपये व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त विश्वजीत विलास पवार यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
भारत सरकार नेहरू युवा केंद्राच्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न होऊन त्यामधून विजेते स्पर्धक हे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. अभिजीत ताटे, प्रा. दिग्वीजय कणसे, प्रा. प्रशांत माळी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन सागर व्हनमाने, सुचिता शेवाळे, फरिदा फकीर यांनी केले. आभार अंकुश ढोले यांनी मानले.No comments:

Post a Comment

Advertise