आटपाडी तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आटपाडीतच घ्यावे : प्राथमिक शिक्षक समितीची मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 24, 2019

आटपाडी तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आटपाडीतच घ्यावे : प्राथमिक शिक्षक समितीची मागणी


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी विधानसभा २०१९ साठी आटपाडी तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आटपाडी तालुक्यातच घ्यावे अशी आग्रही मागणी आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. 
आटपाडी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे निवडणूक प्रशिक्षण विटा येथे घेतले जाते. त्यामुळे अनेक शिक्षकांची गैरसोय होते. ती गैरसोय टाळण्यासाठी सुरुवातीची प्रशिक्षणे आटपाडीतच घ्यावीत म्हणजे सर्व शिक्षकांचा त्रास वाचेल शिवाय वेतनश्रेणी प्रमाणे माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कामासाठी जबाबदारी देण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात यावे, दिव्यांग व गंभीर आजाराच्या कर्मचाऱ्यांनाही सदर कामकाजातून सवलत मिळावी. अशा मागण्यांचे निवेदन दि. २३ रोजी आटपाडीचे तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव, तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, मार्गदर्शक रमेश हेगडे, शिक्षक नेते संजय कबीर, पांडुरंग ऐवळे, सल्लागार योगीराज कुंभरे व जनार्दन मोटे आदी शिष्टमंडळाने सदर निवेदन सादर केले.

No comments:

Post a Comment

Advertise